मुंबई : 'रिंगिंग बेल्स' नावाच्या कंपनीचा वादग्रस्त स्मार्टफोन 'फ्रीडम २५१' पुन्हा एकदा वादात अडकलाय.
या स्मार्टफोनची डिलिव्हरी उद्यापासून म्हणजेच ३० जूनपासून होणार, असा वायदा कंपनीनं केला होता... पण आता कंपनीनं याही बाबतीत एक पाऊल मागे घेतलंय. आता या स्मार्टफोनची डिलिव्हरी ६ जुलैपासून होणार असल्याचं कंपनीनं जाहीर केलंय.
इतकंच नाही तर आता कंपनीनं एक नवी अटही समोर ठेवलीय. या फोनची पैसे भरलेल्या ग्राहकांना सरळ सरळ डिलिव्हरी न देता 'लकी ड्रॉ' काढला जाणार असल्याचं कंपनीनं आता जाहीर केलंय.
उल्लेखनीय म्हणजे, फ्रीडम २५१ या स्मार्टफोनसाठी जवळपास ७ करोड लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांच्या इतकी मोठी संख्या आणि फोनच्या युनिटसची संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे, ३५० ग्राहकांपैंकी एकाच ग्राहकाला हा स्मार्टफोन डिलिव्हर होणार आहे.
उत्तरप्रदेशसाठी लकी ड्रॉची पद्धत वेगळी असेल. कारण, एकट्या उत्तरप्रदेशमधून कंपनीला अडीच करोड रजिस्ट्रेशन मिळालेत. त्यामुळे, इथे २५०० पैंकी केवळ एका ग्राहकाला हा फोन डिलिव्हर होईल.