जम्मू : जम्मू काश्मीरचे फुटीरतावादी नेते सज्जाद लोन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सज्जाद लोन यांच्या पिपल्स कॉन्फरन्सची मदत घेऊन पीडीपीला रोखण्याची संधी भाजप साधत असल्याची चर्चा यातून निर्माण झालीय.
जे. पी. नड्डा आणि राममाधव या दोन भाजप नेत्यांनी ही भेट घडवून आणल्याची चर्चा आहे.
इतरही फुटीरतावादी नेत्यांसाठी सरकारचे दरवाजे नेहमीच खुले असतील असं राममाधव यांनी या बैठकीनंतर सांगितलं.
दरम्यान जम्मू काश्मीरच्या विकासासंदर्भात आपण पंतप्रधानांशी चर्चा केल्याचं सज्जाद लोन यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.