चारा घोटाळा : लालूप्रसाद यांना मोठा दिलासा

बहुचर्चित चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाने आज दोन्ही पक्षकारांना आपसात समन्वय साधण्याचा निर्णय दिलाय. चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना हा मोठा दिलासा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 23, 2013, 02:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बहुचर्चित चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाने आज दोन्ही पक्षकारांना आपसात समन्वय साधण्याचा निर्णय दिलाय. चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना हा मोठा दिलासा आहे. जर दोन्ही पक्षकारांमध्ये सहमती झाल्यास या प्रकरणातील न्यायाधीस बदलता येणार असल्याचही सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
मात्र असं जर होऊ शकलं नाही तर हे प्रकऱण हायकोर्टाकडे सुनावणीसाठी वर्ग करण्यात येणार आहे.या घोटाळ्याची सुनावणी सध्या राची कोर्टात सुरु आहे. मात्र लालूप्रसाद यांनी या प्रकरणातील न्यायाधीस हे पक्षपात करत असल्याचं आरोप करत या प्रकरणातील न्यायाधीस बदलण्याची मागणी त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली होती. आता या प्रकरणाची सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.