जम्मू: पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वीच अमरनाथचे फोटो पाहा... ज्यात शिवलिंगचं मोठं रुप स्पष्ट दिसतंय. काही स्थानीक लोकांचा दावा आहे की, यावेळी शिवलिंग पहिल्याच्या तुलनेत आतापासूनच खूप मोठं दिसतंय.
श्री अमरनाथ श्राइन बोर्डानं अजूनपर्यंत शिवलिंगाबाबत कोणतीही पुष्टी केली नाहीय. मात्र हे सांगितलं की, पवित्र गुफेजवळ काही दिवसांपूर्वी बर्फवृष्टी झाली आहे आणि आताही गुफेच्या आसपास ५-६ फूट बर्फ जमा आहे.
जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी सोमवारी हेलिकॉप्टरनं सर्व परिसराचा दौरा केला होता आणि मंगळवारी श्राइन बोर्डाचे सीईओनं यात्रेपूर्वी पहिली पूजा चंदनबाडीमध्ये केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.