नवी दिल्ली: दिल्लीत मोठ्याप्रमाणावर वाढत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले होते. या प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी शुक्रवारी आज सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला.
यंदाच्या दिवाळीत राजधानी प्रदूषणाच्या धुक्याने काळी पडली होती. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा १७ पटीने अधिक होती.
दिल्लीतील प्रदुषणाने धोक्याची पायरी ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयाने फटाके विकण्यावर बंदी घातली आहे.
प्रदूषित धूर आणि धुक्याने दिल्लीकरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. या स्थितीची तुलना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी "गॅस चेंबर‘शी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिल्लीतील सर्व फटाके विक्रेत्यांचे परवाने बेमुदत काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाशिवाय फटाक्यावरील बंदी कायम राहणार आहे.