पी चिदंबरम झालेत ‘टीव्ही रिपोर्टर’

कर्नाटकात सत्ताधारी भाजपला जोरदार झटका बसल्याने काँग्रेस गोठात आनंदाचे वातावरण आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा झाल्याने वित्तमंत्री पी. चिदंबरम चक्क टीव्ही रिपोर्टरच्या भूमिकेत दिसले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 8, 2013, 06:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
कर्नाटकात सत्ताधारी भाजपला जोरदार झटका बसल्याने काँग्रेस गोठात आनंदाचे वातावरण आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा झाल्याने वित्तमंत्री पी. चिदंबरम चक्क टीव्ही रिपोर्टरच्या भूमिकेत दिसले.
चिदंबरम यांनी एका टीव्ही रिपोर्टरचा माईक घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांच्या समोर माईक धरला. यावेळी जसवंत सिंग संसद भवनमधून बाहेर पडत होते. वित्तमंत्री चिदंबरम यांनी सिंग यांना विचारले, आपण विजयाचे काँग्रेस देणार नाही का?

पी. चिदंबरम यांना टीव्ही रिपोर्टर काँग्रेसला मिळालेल्या विजयाबाबत प्रतिक्रिया विचारीत होते. याचवेळी जसवंत सिंग संसदेतून बाहेर पडताना पाहिले. त्यांनी गडबडीत माईक हाती घेतला आणि जसवंत यांच्यासमोर धरला. प्रश्न विचारून झाल्यानंतर चिदंबरम यांनी सांगितले की, जसवंत सिंग हे सज्जन माणूस आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतून देशात चांगला संदेश गेला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता थारा देत नाही. हा संदेश सर्वच राजकीय पक्षांसाठी आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.