संबल : उत्तर प्रदेशमधील संबल इथल्या एका १५ वर्षीय मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलंय. रिया शर्मा असं या मुलीचं नाव असून तिला ब्रेन ट्युमर झालाय.
या आजारावर उपचार करण्यासाठी आपल्याला आर्थिक मदत मिळावी अशी विनंती रियानं या पत्रातून पंतप्रधानांकडे केलीय. रियाचे आई-वडिल दोघंही खाजगी कंपनीत नोकरी करत होते. मात्र या आजारपणात लेकीकडे लक्ष देण्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागलीय.
लेकीच्या उपचारासाठी तिच्या आईवडिलांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. आता यापुढील उपचाराचा खर्च त्यांना शक्य नाही. त्यामुळे आपण आर्थिक मदत करावी अशी विनंती रियानं मोदींना केलीय. तसंच दिल्लीच्या एम्समध्ये उपचाराची व्यवस्था करण्याची विनंतीसुद्धा रिया आणि तिच्या वडिलांनी मोदींकडे केलीय.