रात्री जंगलात 'दारू पार्टी' करायची ही महिला IAS

उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खिरीच्या महिला जिल्हाधिकारी किंजल सिंह यांच्यावर दुधवा नॅशनल पार्कच्या उपनिदेशक पी. पी. सिंह आणि तेथील कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप लावले आहेत.

Updated: Dec 2, 2015, 12:31 PM IST
रात्री जंगलात 'दारू पार्टी' करायची ही महिला IAS title=

लखीमपूर : उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खिरीच्या महिला जिल्हाधिकारी किंजल सिंह यांच्यावर दुधवा नॅशनल पार्कच्या उपनिदेशक पी. पी. सिंह आणि तेथील कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप लावले आहेत.

महिला आयएएस अधिकारी किंजल सिंह यांनी दुधवा टायगर रिझर्वमध्ये रात्री भरधाव वेगाने गाडी चालवली आणि दारू पार्टी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच किंजल सिंह यांच्यामुळे एक वाघिण आपल्या चार बछड्यांसह अभयारण्य सोडून नागरी वस्तीतील एका उसाच्या शेतात घुसली. 

मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचले प्रकरण 
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापर्यंत गेले आहे. यापूर्वी किंजल सिंह आणि पी.पी. सिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आलोक रंजन यांनी बोलून घेतले. दोघांना बोलवून प्रकरण सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

दारू पार्टी 
दुधवा नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांनुसार जिल्हाधिकारी किंजल सिंह रात्री पार्कमध्ये येतात. त्या दारू पितात, हे नियमांच्या विरोधात आहे. तसेच दारू पिऊन वेगाने गाडी चालविण्याचा आणि जोरात संगीत वाजविण्याचा आरोप लावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विरोध केल्यावर त्यांना कर्मचाऱ्यांना फटकारण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला. 

आरोपांचे केले खंडन 
जिल्हाधिकारी किंजल सिंह यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. त्या म्हणाल्या मी दारू पित नाही. मी किंवा माझ्या स्टाफने कधीच नियम तोडले नाही. दुधवा नॅशनल पार्कच्या कर्मचारी अनधिकृतपणे वृक्षतोड करीत आहेत, ते रोखण्याचा मी प्रयत्न केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.