तिरुवनंतपूरम् : महिलांबाबत एक धक्कादायक आणि वादग्रस्त विधान सुन्नी नेते कनथापूरम एपी अबूबकर मुस्लीयर यांनी केलेय. महिला केवळ मुलांना जन्म देण्यासाठीच असतात, असे ते म्हणालेत.
कोझीकोड येथे मुस्लिम स्टुडंटस् फेडरेशनच्या शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मुस्लीयर हे केरळमधील मुस्लिम समाजातील सुन्नी नेते आहेत. वादग्रस्त विधान करताना त्यांनी म्हटलं, लैंगिक समानतेची संकल्पाना 'गैर-इस्लामी' आहे. महिला कधी पुरूषांची बरोबरी करू शकत नाही, कारण फक्त मुलं जन्माला घालणं एवढचे महिलांचे काम आहे. महिलांमध्ये बौद्धिक सामर्थ्याचा आणि लोकांना नियंत्रित करण्याच्या क्षमतेचा अभाव असतो असे ते म्हणाले.
लैंगिक समानता वैगरे असे काहीतरी बोलले जाते पण ते वास्तवात येणे केव्हाही शक्य नाही. हे इस्लाम आणि मानवतेविरुद्ध आहे आणि बौद्धिकतेने चुकीचे आहे. संकटकालीन परिस्थितीचा त्या सामना करू शकत नाही. ह्रदयविकाराची शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यचिकित्सकांमध्ये एकतरी महिला आहे का? असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.