एक्सक्लुझिव्ह : अनिस अन्सारीचं फेसबुक चॅटींग उघड

ऑक्टोबरमध्ये मुंबईत अटक झालेल्या अनिस अन्सारी या दहशतवाद्याचं फेसबुक चॅटिंग उजेडात आलंय. यावरून, कुर्ल्यातल्या अमेरिकन शाळेवर हल्ला करण्याचा कट अनिस आखत होता, असं स्पष्ट होतंय.

Updated: Jan 16, 2015, 02:54 PM IST
एक्सक्लुझिव्ह : अनिस अन्सारीचं फेसबुक चॅटींग उघड title=

मुंबई : ऑक्टोबरमध्ये मुंबईत अटक झालेल्या अनिस अन्सारी या दहशतवाद्याचं फेसबुक चॅटिंग उजेडात आलंय. यावरून, कुर्ल्यातल्या अमेरिकन शाळेवर हल्ला करण्याचा कट अनिस आखत होता, असं स्पष्ट होतंय.

उसयरीम लोगान या नावानं अमेरिकेतल्या एल्हाज नावाच्या व्यक्तीशी अनिस अन्सारीनं हे फेसबुक चॅट केलंय. यात त्यानं शाळांवर हल्ला करणं कसं योग्य आहे, याचं समर्थन केलंय. तसंच अमेरिकेतल्या टार्गेट्सवर हल्ला करण्यासाठी तो एल्हाजचं ब्रेनवॉशिंग करताना दिसतोय. 

'लोन वुल्फ अटॅक' म्हणजे कोणत्याही संघटनेशिवाय एकट्यानंच आत्मघातकी हल्ला करण्याचं समर्थन अनिस करतोय. 

चॅटिंगमध्ये काय काय बोलणं झालं पाहा हा काही भाग...
अनिस : तू कुठला आहेस?

एल्हाज : लूबनान. पण दार अल हर्बमध्ये राहतो.

अनिस : सौदी?

एल्हाज : मी सैतानांच्या युनायटेड स्नेक्स ऑफ अमेरिकेमध्ये आहे. मर्जीविरुद्ध.

अनिस : तुला माहित्ये का तू किती सुदैवी आहेस?

एल्हाज : माझी मस्करी करतोय का? मला जिथं रहायचं नाही आणि मी जिथं नकोय, तिथं सुदैव कसलं?

अनिस : जगभरातल्या मुजाहिद्दीनांना अमेरिकत असावं असं वाटतं. शत्रूच्या जमिनीवर जाऊन हल्ला करायची त्यांची इच्छा आहे. तुला 'लोन वुल्फ अटॅकर्स' माहित्येत का? त्यांचं हे स्वप्न आहे. पण आम्ही खूप दूर आहोत. फार काही करू शकत नाही.

एल्हाज : म्हणूनच मी तुला अॅड करायला सांगितलं. तुला वाटतं की मी योग्य जागी आहे तर मला मार्गदर्शन हवंय. 

अनिस : तू एकट्यानं खूप काही करू शकशील. असं काही कर ही ओबामा हादरला पाहिजे. तुला व्हेईकल बॉम्ब, IED, प्रेशर कुकर बॉम्ब, थर्माईट बॉम्बबद्दल माहिती आहे का?

एल्हाज : अर्थात. गरम रक्ताच्या कुठल्या मुजाहिद्दीनला याची माहिती नसेल!

अनिस : मग वाट कसली बघतोय? तुझ्या आसपास खूप छान टार्गेट्स असतीलच...

एल्हाज : मला तुझी योजना आवडली.. पण तू या योजनेचा फेरविचार करावास असं वाटतं. शाळेवर का हल्ला करायचा? तिथं निरागस मुलं असतात... त्यांची काहीच चूक नाही.

अनिस : अमेरिकन शाळेत फ्रान्स, इटलीसारख्या अमेरिकेच्या १० मित्रराष्ट्रांमधली मुलं तिथं जातात. यापेक्षा शत्रूला दुसऱ्या  कशानंच जास्त दुखवलं जाऊ शकत नाही. त्यांच्यापैकी कोणीच निरागस नाही. जिथं सर्वात जास्त दुखेल अशाच ठिकाणी घाव घातला पाहिजे. 

एल्हाज : तुझी कारणमिमांसा इतिसाहासानं सिद्ध केलीय. पण भारतात तुला अशी टार्गेट्स कुठे मिळणार?

अनिस : मुंबई... इथं खूप आहेत.

एल्हाज : माझ्यासाठी तुझा सल्ला खूप चांगला आहे... पण प्लीज शाळांवर हल्ल्याचा फेरविचार कर. 

अनिस : माझ्या लिस्टवर अशा साध्या शाळा नाहीत. या स्पेशल शाळा आहेत. इथं व्हीआयपींची मुलं जातात. तिथले शिक्षक, कर्मचारी सगळे हाय प्रोफाईल आहेत. पण इथं असा हल्ला करणं वाटतं तितकं सोपं नाही. या शाळांना २४ तास संरक्षण असतं.

एल्हाज : मी तुझ्या बाजुनं आहे आणि तू फसलास तर मला आवडणार नाही...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.