गूड न्यूज: १५ ऑक्टोबरपासून मिळणार कायमचं पीएफ खातं

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं आपल्या सर्व सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबरपासून कायमचं पीएफ खातं क्रमांक देणार आहे. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नावानं मिळणारा हा खाते क्रमांक कोअर बँकिंग सेवेसारखी सेवा देईल. म्हणजेच हा नंबर मिळाल्यानंतर नोकरी बलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ अकाऊंट नंबर बदलण्याची किंवा ट्रान्सफर करण्यासाठी गरज नसेल.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 21, 2014, 05:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं आपल्या सर्व सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबरपासून कायमचं पीएफ खातं क्रमांक देणार आहे. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नावानं मिळणारा हा खाते क्रमांक कोअर बँकिंग सेवेसारखी सेवा देईल. म्हणजेच हा नंबर मिळाल्यानंतर नोकरी बलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ अकाऊंट नंबर बदलण्याची किंवा ट्रान्सफर करण्यासाठी गरज नसेल.
सध्या चालू आर्थिक वर्षात पीएफच्या सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबर २०१४पासून हा यूएएन नंबर दिला जाणार आहे. यानंतर इतरही सदस्यांना हा क्रमांक दिला जाईल. यूएएन नंबर मिळाल्यानंतर सदस्यांना कंपनी बदलल्यानंतर नवीन पीएफ अकाऊंट नंबर मिळणार नाही. यामुळं असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना खूप आराम मिळणार आहे.
प्रायव्हेट क्षेत्रातील/ असंघटीत क्षेत्रातील कर्मचारी खूप लवकर लवकर नोकरी बदलतात. त्यामुळं त्यांचं पीएफ अकाऊंट नंबर बदलतं किंवा ट्रान्सफर करावं लागतं. अशात त्यांचा भविष्य निर्वाह निधी खर्च होण्याची शक्यता असते. मात्र आता यूएएन नंबर मिळाल्यास कर्मचाऱ्यांना आयुष्यभर एकच पीएफ अकाऊंट नंबर ठेवता येईल. ईपीएफओद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे.
सीडॅक कंपनीला या योजनेचा रोडमॅप बनवण्याचं काम सोपवण्यात आलंय. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवान्स कंप्युटिंग (सी-डॅक), दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत काम करणारी प्रमुख संघटना आहे. यूएएन क्रमांक मिळाल्यानंतर संघटनेचं काम थोडं हलकं होणार आहे.
ईपीएफओ संघटनेला दरवर्षी १२ लाखांहून अधिक पीएफ खात्यांना ट्रान्सफर करावं लागतं. गेल्यावर्षी पीएफ ट्रान्सफर आणि विड्रॉलचे १.२१ कोटी रुपयांची उलाढाल झाली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त कर्मचारी आपली नोकरी बदलल्यानं आपलं खातं बंद करून नवं खातं उघडतात. या प्रक्रियेला खूप वेळ लागतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.