www.24taas.com, वृत्तसंस्था, जींद
हिस्सार जिल्ह्यातील नारनौंद गावातील सतरोल खापनं जवळपास ६५० वर्षांपासून सुरू असलेली परंपरेला फाटा देत विवाहावर लादले गेलेले बंधनं खापच्या निर्णयांना रद्द केलंय. नारनौंद गावातील देवराज धर्माशाळेत आयोजित महापंचायतीमध्ये खाप चौधरींनी एका सुरात हा निर्णय घेतलाय की आता सतरोल खाप इथल्या ४२ गावांतील लोक आपल्या मुलांचं लग्न करू शकतील. म्हणजेच खापनं आंतरजातीय विवाहाला अखेर मान्यता दिलीय. खापचा हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक निर्णय मानला जातोय.
हा निर्णय घेतांना खापनं एक अट ही घातलीय. असा आंतरजातीय विवाह करतांना मुलगा किंवा मुलीनं आपलं गाव,गोत्र आणि शेजारच्या गावातील व्यक्ती सोडून करावं. यानंतर खाप पंचायतीला काही हरकत नसेल.
महापंचायतीचं अध्यक्षपद भूषवणारे सतरोल खापचे प्रधान सुभेदार इन्द्र सिंहनं सांगितलं की या निर्णयाचं कारण सतरोल खापची भाऊबंधकी तोडणे नाही तर नात्यांवरील बंधनं मोकळं करणं होय. महापंचायतीचे वजीर मान राजथल म्हणाले आजची परिस्थिती आणि वेळ बघता नात्यांमधील बंधनं मोकळे करायला हवे. यामुळं सतरोल खापची भावकी संपणार नाही तर नातेसंबंध दृढ होतील.
बसाऊराम नारनौंद म्हणाले सध्या इकडे मुलींची संख्या खूप कमी झालीय ज्यामुळं आमच्या मुलांच्या विवाहासाठी आम्हाला खूप दूर जावं लागतं. आता वेळ आलीय इतकी जुनी परंपरा बदलण्याची गरज आहे. परिस्थितीनुसार खापनं आपल्या नियमांमध्ये खूप फेरबदल केले आहेत आणि आणखीही बदलतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.