नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) आपल्या ६ कोटी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. आता पीएफचे पैसे ऑनलाइन काढता येणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये ही सुविधा पीएफ सुरू करणार आहे.
या सोयीमुळे ज्यांना आपल्या पीएफमधील काही भाग काढायचा असेल, त्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यास पैसे सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
कामगार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइ्न पीएफ काढण्याच्या सुविधेवर २४ जुलैला चर्चा होईल. ईपीएफओमध्ये याबाबत एक बैठक बोलविण्यात आलीय. सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
ही सेवा सुरू झाल्यानंतर कमीत कमी ४० टक्के यूएएन ग्राहकांना त्याचा थेट फायदा होईल. ग्राहकांचा आधार नंबर आणि बँक खात्याची माहिती त्यात असेल. त्यामुळं पैसे थेट खात्यात जमा होऊ शकतील. आतापर्यंत १२ टक्के खातेधारकांचा आधार क्रमांक यूएएनशी जोडला गेलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.