नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विद्यासागर राव यांची नियुक्ती होऊ शकते, अशी गृहमंत्रालयातील सुत्रांची माहिती आहे.
युपीए सरकारनं नियुक्त केलेले राज्यपाल शंकरनारायणन यांनी बदली केल्याच्या निषेध करत राज्यपालदाचा राजीनामा सादर केल्यामुळं सध्या गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहलींकडे राज्याच्या राज्यपालपदाचा कारभार सोपवण्यात आलाय. आता विद्यासागर राव यांचं नाव महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी निश्चित मानलं जात आहे..
तर राजस्थानच्या राज्यपालपदी कल्याण सिंह यांचं नाव चर्चेत आहे. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष वाजू भाई कर्नाटकचे तर मृदुला सिन्हा गोव्याच्या राज्यपाल होण्याची शक्यताय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.