राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके

दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतात शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री १२.४५ ते १२.५५च्या दरम्यान हे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही. 

Updated: Dec 26, 2015, 08:40 AM IST
राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके title=

नवी दिल्ली : दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतात शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री १२.४५ ते १२.५५च्या दरम्यान हे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही. 

या भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तानची राजधानी काबूल असल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात भूकंपामुळे काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

दिल्ली-एनसीआरसह चंदीगड, जयपूर आणि काश्मीरव्यतिरिक्त पाकिस्तानातील लाहोर आणि इस्लामाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात भूकंपाचे सर्वाधिक धक्के काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि पाकिस्तानातील लाहोर शहरात जाणवले.