नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचनाक भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसनं मात्र या भेटीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
मोदींची ही सरप्राईज व्हिजिट नसून पूर्वनियोजीतच असल्याचा ठामपणे दावा केलाय. तसंच परराष्ट्र संबंधांकडे पर्यटन म्हणून मोदींनी पाहू नये, असा खोचक सल्लाही काँग्रेसनं मोदींना दिलाय.
अधिक वाचा : नरेंद्र मोदींचे पाकिस्तानात पाऊल, शरीफ यांची घेतली गळाभेट
मोदी यांनी पाकिस्तानला अचनाक भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या भेटीला निमित्त होतं ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचं. मोदी अफगाणिस्तानच्या संसदेचं उदघानं करून भारताकडे रवाना झालेले असताना त्यांनी पाकिस्तान भेटीची माहिती ट्विटवरून दिली. आणि ते पुढच्या दोन तासात लाहोरला दाखलही झाले.
पंतप्रधान नवाझ शरीफ हे त्यांना भेटण्यासाठी लाहोर विमानतळावर आले. यावेळी मोदींनी शरीफ यांची गळाभेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही भेट एवढ्यावरच संपली नाही. तर शरीफ यांनी मोदींनी थेट त्यांच्या निवासस्थानी नेले. त्याठिकाणी दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेतला मजकूर जरी समजू शकला नसला तरी या बर्थडे डिप्लोमसीकडे जगभरातून सकारात्मकरीत्या पाहिलं गेलंय.
तसंच भारत पाकिस्तान संबंधांचा एक नवा अध्याय यानिमित्तानं सुरू होईल असा आशावादही निर्माण झालाय. विशेष म्हणजे तब्बल अकरा वर्षांनंतर पहिल्यांद भारताचा पंतप्रधान पाकिस्तान दौ-यावर गेल्याची ऐतिहासिक घटनाही यानिमित्तानं घडलीय.