नवी दिल्ली : दूरदर्शनच्या ट्विटर अकाऊंटवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या टीमला 'माकड' असं संबोधण्यात आलं... आणि एकच गहजब उडाला... दूरदर्शच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट झालेल्या या एका छोट्या चुकीमुळे या वाहिनीला माफी मागावी लागलीय.
त्याचं झालं असं की, ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, परदेश मंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांचा एक फोटो शेअर करण्यात आला... या फोटोवर 'कॅप्शन' दिलं होतं... 'जिंगल ऑल द वे... ख्रिसमसच्या मुहूर्तावर सांताच्या ड्रेसमध्ये एक व्यक्ती माकडांना अन्न भरवताना...'
अर्थातच, मोदी-शाहांच्या फोटोसाठी चुकीची कॅप्शन वापरली गेली होती... पण, हे काही दूरदर्शनच्या लवकर लक्षात आलं नाही आणि थोड्याच वेळात ही पोस्ट व्हायरल झाली... त्यावर लगेचच प्रतिक्रिया येणंही सुरु झालं. त्यानंतर, जेव्हा ही गोष्ट दूरदर्शनच्या लक्षात आली तेव्हा तत्काळ हे ट्विट हटवण्यात आलं.
आपल्या चुकीवर दूरदर्शननं माफी मागितलीय. जाणून बुजून नाही तर चुकीनं ही गोष्ट घटल्याचं दूरदर्शननं कबूल केलंय... तसंच, अनावधानानं फोटोवर दुसऱ्याच फोटोची कॅप्शन ट्विट केली गेली, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.