इंदूर : लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या डॉक्टरला रिशेप्सनिस्टने असा धडा शिकविला की तो जन्मात विसरणार नाही. दिलेले वचन तोडल्याचा आरोप लावत तरूणीने डॉक्टरला वाईट पद्धतीने झोडपले आणि त्याचे कपडे फाडले.
हे प्रकरण मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील आहे. वसुंधरा शर्मा नावाच्या २७ वर्षीय युवतीने डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून त्याला चांगलेच कानफटवले. तिचा हा रुद्रवतार पाहून उपस्थित लोक आणि सुरक्षा रक्षकही आश्चर्यचकीत झालेत.
सुरक्षा रक्षकांनी खासगी प्रकरण म्हणून तिला रोखले नाही. या वेळी तरूणीने डॉक्टरवर ७० वेळा हल्ला केला. तरुणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सौजन्य - डेली मेल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.