नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सीन स्पाईसर यांनी ही माहिती दिली.
अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी स्वत:हून फोनवर संवाद साधलेले मोदी हे जगातील पाचवे नेते ठरलेत. निवडून आलेल्या ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांनी कॅनडा, मेक्सिको, इस्रायल आणि मिस्त्र या चार देशांच्या प्रमुखांशी फोनवर चर्चा केलीये. त्यानंतर त्यांनी मोदींशी संवाद साधलाय.
विशेष म्हणजे रशिया, जपान, चीन आणि युरोपातील बलाढ्य राष्ट्रांना डावलून ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानांशी संवाद साधलाय.. भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं या दोन्ही नेत्यांमधील चर्चा अत्यंत महत्वाची मानली जाते..