केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्सना दिवाळीचं गिफ्ट दिलंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. 

Updated: Oct 27, 2016, 04:19 PM IST
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्सना दिवाळीचं गिफ्ट दिलंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. 

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेंशनर्सना वर्षातून दोनदा महागाई भत्ता (डीए) दिला जातो. वाढीव महागाई भत्ता जुलै २०१६ पासून लागू होईल. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२५ टक्क्यांहून वाढून आता १२७ टक्के होणार आहे. या वर्षीच्या सुरुवातीला महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ६ टक्क्यांनी वाढवून १२५ टक्के करण्यात आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळानं गुरुवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन टक्के महागाई भत्त्याला मंजुरी दिली. कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्त्यावर आज शिक्कामोर्तब झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 

या निर्णयाचा फायदा देशातील ५० लाख केंद्रीय कर्माचारी आणि ५८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.