नवी दिल्ली : अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ

नवी दिल्लीत अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा एक व्हिडीओ समोर आलाय.

Updated: Oct 27, 2016, 01:53 PM IST
नवी दिल्ली : अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ title=

नवी दिल्ली : नवी दिल्लीत अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा एक व्हिडीओ समोर आलाय.

या अपघातात दिल्लीतील सरकारी शाळेतील शिक्षकाचा मृत्यू झालाय. पहिल्यांदा बाईकस्वराला कारने धडक दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकखाली तो बाईकस्वार चिरडला गेला. या अपघातानंतर कारचा चालक आणि ट्रक चालक दोघेही तेथून पळून गेले. 

अपघातात जबर जखमी झालेले मनीष यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारची बाईकला बसलेली धडक इतकी जोरात होती की तो लांब अंतरावर जाऊन पडला. त्यानंतर कोणी मदतीला येण्याआधीच ट्रकने त्याला चिरडले.