नवी दिल्ली : शेतकऱ्याच्या आडून का असेना अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ऐन रब्बी हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिले आहेत.
अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. त्यानंतर ग्रामीण, जिल्हा आणि सहकारी बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी पुरेशी रोकड उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांना दिलेत. त्यानुसार नाबार्डकडे उपलब्ध असणाऱ्या 23 हजार कोटींचा जास्तीत जास्त वापर करून जिल्हा बँकांना रोकड उपलब्ध करून देण्यात येईल.
दरम्यान जिल्हा बँकांचा मुद्दा लावून धरल्यामुळंच त्यांना निधी उपलब्ध करण्यात आल्याचा दावा शिवसेनेनं केलाय.