शिवराजांविरुद्ध स्वकियांची 'व्यापम' मोहीम; मुख्यमंत्री नरमले

चार दिवसांत चार मृत्यू झाल्यावर अखेर मंगळवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान झुकलेत. दोन वर्षांपासून स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयकडे देण्यास सरकार तयार झालंय. वरकरणी हा विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद वाटत असला, तरी शिवराज वरमण्याचं खरं कारण स्वकियांनी उघडलेली मोहीम आहे.

Updated: Jul 8, 2015, 10:56 AM IST
शिवराजांविरुद्ध स्वकियांची 'व्यापम' मोहीम; मुख्यमंत्री नरमले title=

नवी दिल्ली : चार दिवसांत चार मृत्यू झाल्यावर अखेर मंगळवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान झुकलेत. दोन वर्षांपासून स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयकडे देण्यास सरकार तयार झालंय. वरकरणी हा विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद वाटत असला, तरी शिवराज वरमण्याचं खरं कारण स्वकियांनी उघडलेली मोहीम आहे.

मध्यप्रदेशच्या माजी  मुख्यमंत्री उमा भारतींनी काल संध्याकाळी केलेल्या या विधानानं आज भोपळमधला राजकीय नूरच पालटून टाकला. कालपर्यंत व्यापम घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसनं उघडलेल्या मोहीमेचा स्वतःच्या भात्यातल्या सगळ्या अस्त्रांनी मुकाबला करू पाहाणारे शिवराज सिंह आज बॅकफूट दिसले. चार दिवसात घोटाळ्याशी संबंधित चार जणांचे बळी गेलेत. आणि अख्ख्या देशातलं राजकारण मध्यप्रदेशातल्या या खून घोटाळ्यावर केंद्रीत झालंय. अखेर शिवराज सिंहांनी आपली तलवार म्यान केलीय.

खरंतरं पत्रकार आशिष सिंगच्या अकस्मात मृत्यूनंतर काँग्रेसनं सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती. पण गेले चार दिवस भाजपचा प्रत्येक नेता मध्यप्रदेशात स्थापण्यात आलेल्या स्पेशल टास्क फोर्सची जोरदार पाठराखण करत होता.  

व्यापमचा विस्तार किती मोठा आहे. 2000 हजार आरोपी आहेत. त्यात पैकी 500 आरोपी फरार आहेत. पण जसजसा तपास पुढे गेला, तसतशी बळींची संख्या वाढत गेली. विविध कारणांमुळे साक्षीदार, आरोपी, संशियत अशा एकूण 47 जणांचा मृत्यू झाला. पण शिवराज आपल्या भूमिकेवर ठाम होते. माजी मुख्यमंत्री उमा भारतीं एकच टोला हाणाला आणि परिस्थिती पालटली... मलाही आता भीती वाटतेय, अशा शब्दांत उमा भारतींनी आपली भावना बोलून दाखवली.

शिवराज सिंह चौहान यांची मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी हे तिसऱ्यांदा वर्णी लागलीय. त्यांच्या विरोधात काम करणारे पक्षात कमी नाहीत. त्यात उमा भारतींचा नंबर वरचा आहे. चारही बाजूनं टीका होत असताना स्वकीयांचा विरोध परवडणारा नाही हे शिवराज सिहांनी वेळीच ओळखलंय. म्हणूनच सीबीआय चौकशीचा मार्ग स्वीकारलाय. यामुळे काँग्रेसची तोंडं बंद होतीलच. त्याचप्रमाणे उमा भारतींसारख्या राज्यातल्या प्रतिस्पर्ध्यांनाही टीकेची संधी मिळणार नाहीय.

दरम्यान, मध्य प्रदेशमधल्या व्यापम घोटाळ्याशी संबंधित असलेल्या सर्व संबंधितांना सुरक्षा देण्याची मागणी, भाजपचे राष्ट्रीय महासचीव मुरलीधर राव यांनी केली आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी न्यायालया मार्फत होत असून, या घोटाळ्याशी संबंधित सर्वांच्या सुरक्षेची दखल न्यायालय घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या कामानिमित्त नागपुरात आले असता त्यांनी ही मागणी केली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.