नवी दिल्ली : दिल्लीच्या मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केलाय.
सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना 2 कोटी रुपये दिले असा सनसनाटी आरोप कपिल मिश्रा यांनी केलाय. केजरीवाल यांनी जैन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेताना आपण स्वतः पाहिल्याचा दावाही मिश्रा यांनी केलाय.
50 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येऊ नये यासाठी ही डील झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केलीय.
दरम्यान आम आदमी पार्टीने मिश्रा यांचे हे सगळे आरोप फेटाळलेत.. मात्र या गंभीर आरोपांमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि आम आदमी पार्टी पुन्हा वादाच्या भोव-यात सापडलीय.