देशातील पहिलं जावयांचं गाव

घरजावई होणे हे अनेकांना रुचत नसलं तरी भारतात एक असं गाव आहे जे घरजावयांचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील सौदापूर हे गाव घरजावयांचे गाव म्हणून लोकप्रिय होत चालले आहे. या गावातील प्रत्येक तिसऱ्या-चौथ्या कुटुंबात घरजावई असून आता तर जावयांचेही जावई झाले आहेत.

Updated: May 7, 2017, 01:52 PM IST
देशातील पहिलं जावयांचं गाव title=

पानिपत : घरजावई होणे हे अनेकांना रुचत नसलं तरी भारतात एक असं गाव आहे जे घरजावयांचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील सौदापूर हे गाव घरजावयांचे गाव म्हणून लोकप्रिय होत चालले आहे. या गावातील प्रत्येक तिसऱ्या-चौथ्या कुटुंबात घरजावई असून आता तर जावयांचेही जावई झाले आहेत.

१२.५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात फक्त ७.५ हजारच स्थानिक नागरिक आहेत. ६०० पेक्षा अधिक जावई सध्या या गावात स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे, सौदापूरचे सरपंच राजेश सैनी यांचे वडील जय भगवान हेसुद्धा या गावचे जावईच आहेत. सौदापूरच्या मुलींचे बाहेरगावच्या वरासोबत लग्न लावून दिले जाते. मात्र, काही अडचणी आल्यास त्या पतीसोबत मूळ गावी येतात. माहेरची मंडळी मग मुलीसोबतच जावयालाही रोजगार मिळवून देतात. त्यामुळे ते नंतर येथेच स्थायिक होतात.

गावचे सरपंच म्हणतात की, आमच्या गावातील रोजगाराच्या संधींमुळेच जावयांची संख्या वाढली आहे. सौदापूरपासून पानिपत शहर जवळच आहे. त्यामुळे लोक या ठिकाणी राहण्यास प्राधान्य देतात.