नवी दिल्ली : कॅशलेस व्यवहार म्हणजेच डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकार आग्रही असतानाच डेबिट कार्डनं व्यवहार करण्यावर सर्व्हिस चार्ज लावायचा निर्णय घेण्यात आला आहे. डेबिट कार्डनं एक हजार रुपयांचा व्यवहार केल्यावर अडीच रुपये सर्व्हिस चार्ज लावण्यात आला आहे.
मोदींच्या डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत डेबिट आणि क्रेडिट कार्डवर कोणताही सर्व्हिस चार्ज न घेण्याचा निर्णय झाला होता, पण आता मात्र हा सर्व्हिस चार्ज घेण्यात येणार आहे. क्रेडिट कार्डनं एक हजारांचा व्यवहार केला तर 25 रुपये सर्व्हिस चार्ज घेण्यात येणार आहे.