दाऊद इब्राहिम वेंटिलेटरवर, मोजतोय शेवटच्या घटका ?

भारताचा शत्रू दाऊद इब्राहिम जिवनाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. दाऊद इब्राहिमच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन फेल ठरलं आहे. तो सध्या वेंटीलेटरवर आहे.

Updated: Apr 29, 2017, 10:58 AM IST
दाऊद इब्राहिम वेंटिलेटरवर, मोजतोय शेवटच्या घटका ? title=

नवी दिल्ली : भारताचा शत्रू दाऊद इब्राहिम जिवनाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. दाऊद इब्राहिमच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन फेल ठरलं आहे. तो सध्या वेंटीलेटरवर आहे.

२० दिवसापूर्वी दाउद इब्राहिमला पॅरालिसीसचा अटॅक आला होता. यानंतर दाऊदचं अर्ध शरीर निकामी झालं आहे. अटॅक आला तेव्हा दाऊद क्लिफ्टन हाऊसमध्येच होता.

पॅरालिसीस अटॅकनंतर छोटा शकील दाऊदच्या सेवेत आहे. २२ एप्रिलला दाऊदच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन कराचीमध्ये झालं. पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या सर्जनने हे ऑपरेशन केलं. पण ऑपरेशन यशस्वी नाही झालं.

ऑपरेशन फेल झाल्यानंतर दाऊद वेंटीलेटरवर आहे. दाऊदच्या वेंटीलेटरवर असण्याची माहिती त्याच्या मुंबईतील नातेवाईकांना मिळाल्यानंतर ते बैचेन झाले आहेत. पाकमोडिया स्ट्रिटमध्ये राहणाऱ्या दाऊदचा भाऊ इकबाल कासकरच्या घरी त्याच्या नातेवाईकांचं येणं-जाणं वाढलं आहे.

काही वर्षांपूर्वी कासकर परिवाराने मुंबईतील चर्नी रोड येथील बडा कब्रिस्तानमध्ये दाऊदला दफन करण्यासाठी जागा बुक ठेवली आहे. याच कब्रिस्तानमध्ये दाऊदच्या पित्याला देखील दफन केलं होतं. पण नातेवाईकांच्या मते दाऊदच्या मृत्यूनंतर त्याला मुंबईत नाही आणलं जाणार अशी माहिती एका हिंदी न्यूज वेबसाईटने दिली आहे.

अधिकृत दुजोरा नाही

या बातमीला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर दुसरीकडे दाऊदच्या कुटुंबीयांनी मात्र ही केवळ एक अफवा असल्याचं म्हटलंय. 'दाऊदची तब्येत एकदम सुस्थितीत आहे. तो केवळ आपल्या पत्नीच्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता' असं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलंय.