मुंबई : पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते.
ग्राहकांनी एक लीटर पेट्रोलची किंमत मोजून 940 ते 950 एमएल पेट्रोलच मिळत होतं. म्हणजे लीटरमागे 50 ते 60 एमएल पेट्रोलची चोरी होत होती. रोज 40 ते 50 हजार रुपये यातून हे कमवत होते म्हणजेच महिण्याला 12 ते 15 लाख रुपये लोकांना फसवून हे कमवत होते.
१. रिजर्व्ह लागण्याआधी भरा पेट्रोल : खूप कमी लोकांना माहित आहे की रिकाम्या टँकमध्ये पेट्रोल भरल्याने नुकसान होतं. कारण टाकी खाली असल्यास त्यात अधिक प्रमाणात हवा असते. त्यामुळे तुम्ही पेट्रोल भरतात तर हवेमुळे पेट्रोल तुम्हाला कमी प्रमाणात मिळतं. त्यामुळे रिजर्व्ह लागण्यापूर्वी पेट्रोल भरा.
२. डिजीटल मीटर असणाऱ्या पेट्रोल पंपवर भरा पेट्रोल : पेट्रोल नेहमी डिजिटल मीटर असणाऱ्या पंपावरच भरा. जुन्या पेट्रोल पंप मशीनमध्ये गडबडी होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तुमच्या ते लक्षात देखील येणार नाही.
३. मीटरवर ठेवा नजर : जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरवत असता तेव्हा तुम्ही गाडीतून खाली नाही उतरत. याचा फायदा तेथील कर्मचारी घेतात. पेट्रोल भरतांना मीटरवर लक्ष ठेवावं. पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्याकडे देखील तुमचं लक्ष असलं पाहिजे.
४. मीटरवर शुन्य नेहमी बघा : काही पेट्रोल पंपाचे कर्मचारी तुम्ही जेवढी रक्कम सांगतात तेवढ्याचं पेट्रोल भरतात. पण पेट्रोल भरतांना ते रिसेट केलं गेलं की नाही ते नक्की पाहा. म्हणजे मीटर पूर्ण शुन्यावर आणलं की नाही यावर लक्ष असू द्या.
५. मीटर जोरात धावत असेल तर थांबवा : पेट्रोल भरतांना जर मीटर जोरात धावत असेल तर समजा काहीतरी गडबड आहे. पेट्रोल पंपवरच्या कर्मचाऱ्याला मीटरची स्पीड नार्मल करण्यासाठी सांगा.
६. ऑटो कट लागल्यानंतर नका भरू पेट्रोल : टाकी फुल करतांना ऑटो कट लागल्यास पेट्रोल पंपवाले राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरु का असं सांगतात. पण तसं करु नका. ऑटो कट झाल्यानंतर तुमच्या गाडीच्या टाकीत कमी पेट्रोल जातं. मशीन रिसेट न झाल्यामुळे पेट्रोल देखील जात नाही. फक्त हवा तुमच्या गाडीत जात असते.
७. मीटर बंद झाल्यानंतर लगेच पाईप काढू देऊ नका : तुम्ही पाहिलं असेल की पेट्रोल पंपावर तेल भरल्यानंतर पाईप लगेच काढला जातो. कर्मचारी पेट्रोल टाकल्यानंतर ऑटो कट होताच पाईप गाडीच्या टाकीतून बाहेर काढतात. त्यामुळे पाईपमध्ये वाचलेलं पेट्रोल तुमच्या टाकीत जात नाही.
८. राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरु नका : अनेक लोकं 500 किंवा 1000 रुपयांचं पेट्रोल भरतात. पण पेट्रोल पंप अशा नंबरवर आधीच मशीन फिक्स करुन ठेवतात. त्यामुळे राउंड फिगरच्या रक्कमेचं पेट्रोल भरु नका. 550 किंवा 1125 अशा रुपयांचं पेट्रोल भरा. शक्य तेवढं डिजीटल पेमेंट करा. यामुले पेट्रोल चोरी करणं अवघड होऊन जातं.
९. सुनसान पेट्रोल पंपवर जाऊ नका : नेहमी अशा पेट्रोलपंपवर जाऊन पेट्रोल भरा जेथे नेहमी गाड्यांची वर्दळ असेल. सूनसान ठिकाणी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरु नका. कारण अशा ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते. अशा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतांना पाईपमधून आधी हवा बाहेर काढण्यासाठी सांगा. मग टाकीत पाईप टाकण्यास सांगा.
१०. शंका असल्यास तक्रार करा : जर तुम्हाला पेट्रोल चोरीची शंका आल्यास लगेचच पेट्रोल पंपच्या मॅनेजरकडून कंप्लेंट बुक मांगून लिखित तक्रार दाखल करा. जर तुम्हाला कंप्लेंट बुक दिलं जात नसेल तर कंपणीच्या कस्टमर केअरकडे तक्रार दाखल करा.