नवी दिल्ली : कोटक महिंद्रा बँकेनं आयएनजी वैश्य बँक संपूर्णतः आपल्या पंखांखाली घेण्याची घोषणा केलीये. १५ हजार कोटींचा हा सौदा असून भारतीय बँकांमधलं हे सर्वात मोठं विलिनीकरण ठरणार आहे. हे विलिनीकरण रोख रक्कमेनं न होता पूर्णतः शेअरमधून होणार आहे.
आयएनजी वैश्य बँकेच्या १००० शेअर्सच्या बदल्यात कोटकचे ७२५ शेअर्स मिळतील. या विलिनीकरणानंतर कोटक महिंद्रा ही देशातली चौथ्या क्रमांकाची खासगी बँक गणली जाईल आणि दक्षिण भारतात बँक आपले पाय आणखी घट्ट रोवेल.
विलिनीकरणानंतर कोटकच्या प्रमोटर्सचा बँकेतला हिस्सा ४० टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर येईल आणि आयएनजी वैश्य ६.४ टक्क्यांसह कोटक महिद्रा बँकेतला दुस-या क्रमांकाचा भागिदार असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.