www.24taas.com, लखनऊ
मुस्लीम बांधवांनी केसांना काळं करण्यासाठी डाय लावू नये, असा फतवाच दारुम उलूम देवबंद या संघटनेनं काढलाय. याआधीही मुलींनी जीन्स घालू नये, टॅटू काढू नये, असे अनेक फतवे या संघटनेनं लादण्याचा प्रयत्न केलाय.
‘शरियतनुसार मुस्लिम पुरुष आणि स्त्रीने केसांना रंग लावताना काळा रंग वापरणे इस्लामविरोधी आहे. त्यामुळे काळ्या रंगाचा हेअरडाय मुसलमानांनी वापरू नये. त्याऐवजी मेहंदी किंवा मेहंदीसारख्या रंगाचा डाय वापरावा’ असं उलूम देवबंद या संघटनेनं बजावलंय. ‘नमाजपूर्वी वजू केला जातो. त्यावेळी पाणी केसांच्या मुळाशी गेले पाहिजे. हेअर डाय काळ्या रंगाचा असेल तर पाणी केसांच्या मुळाशी जात नाही. त्यामुळे केसांना काळा रंग लावला असेल तर नमाजसुद्धा ग्राह्य धरता येणार नाही. मुसलमानांनी केसाला मेहंदी किंवा लाल रंग लावावा’ असं स्पष्टीकरणही या संघटनेच्या नेत्यांनी दिलंय.
इस्लामची शिकवण देणारी देशातील महत्त्वाची संस्था दारूल उलूमही उत्तर प्रदेशातील देवबंद येथे आहे. यापूर्वी या संघटनेननं अनेक फतवे काढले आहेत.