आता ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात

अनुदानित सिलिंडरची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केली आहे. यापुढे दरवर्षी ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात मिळणार आहेत. लवकरच या घोषणेची अंमलबजावणी होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 12, 2012, 08:57 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अनुदानित सिलिंडरची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केली आहे. यापुढे दरवर्षी ६ ऐवजी ९ सिलिंडर अनुदानित दरात मिळणार आहेत. लवकरच या घोषणेची अंमलबजावणी होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरवरील अनुदान कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यावर समाजातील सर्व थरांतून निषेध व्यक्त केला जात होता. सरकारच्या निर्णयामुळे केवळ ६ सिलिंडर्सच अनुदानित किमतीमध्ये मिळणार होते. त्यापुढील सिलिंडर्स बाजारभावाने मिळणार होते. मात्र आता सरकारने ६ ऐवजी ९ सिलिंडर्स अनुदानित किमतीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र सरकारच्या या निर्णयावर निवडणूक आयोग नाखुश आहे. सरकारने गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचं म्हणत निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे.