दादरी हत्याकांड : चार्जशीटमध्ये ना गोहत्या ना सांप्रदायिक वाद

बिहार निवडणुकीपूर्वी घडलेल्या दादरी हत्याकांडानं संपूर्ण देशात एकच खळबळ उडवून दिली होती.

Updated: Dec 24, 2015, 04:30 PM IST
दादरी हत्याकांड : चार्जशीटमध्ये ना गोहत्या ना सांप्रदायिक वाद  title=

लखनऊ : बिहार निवडणुकीपूर्वी घडलेल्या दादरी हत्याकांडानं संपूर्ण देशात एकच खळबळ उडवून दिली होती. गोहत्या आणि सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावरून देशात एकच वाद उफाळून आला... या प्रकरणानं आता वेगळंच वळण घेतलंय. 

दादरी प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी जी चार्जशीट दाखल केलीय त्यात कुठेही गोहत्या किंवा सांप्रदायिकतेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या चार्जशीटमध्ये भाजप काही नेत्यांसहीत १५ लोकांवर तक्रार दाखल करण्यात आलीय. 

गोहत्येच्या कारणामुळे या वादाची सुरुवात झाली असं यात म्हटलं गेलंय पण हे खात्रीशीररित्या सांगण्यात आलेलं नाही. या चार्जशीटमध्ये भाजपचे नेते विशाल राणा, त्यांचा चुलत भाऊ शिवम यांचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलाय. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीच्या नावाचाही उल्लेख आहे. 

दादरीमध्ये गोहत्येच्या संशयावरून अखलाख आणि त्याच्या कुटुंबीयांना अत्यंत क्रूर अशी मारहाण करण्यात आली. यामध्ये, अखलाकचा मृत्यू झाला होता तर त्याचा मुलगा जबर जखमी झाला होता.