पुढील २४ तासांत 'अशोबा' चक्रीवादळ धडकण्याचा धोका

अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं 'अशोबा' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकतं. 

ANI | Updated: Jun 9, 2015, 07:37 PM IST
पुढील २४ तासांत 'अशोबा' चक्रीवादळ धडकण्याचा धोका title=

मुंबई: अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं 'अशोबा' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकतं. 

'सुपर सायक्लोन'मध्ये रूपांतरित होताना हे चक्रीवादळ उत्तर, वायव्य दिशेनं सरकत ओमानच्या दिशेनं जात असल्यानं भारताला धोका कमीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळं समुद्र रौद्ररूप धारण करणार असून कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

मध्यपूर्व अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर गेल्या सहा तासांत वायव्य दिशेनं वाटचाल सुरू असताना त्याची तीव्रता वाढून ते सोमवारी सकाळी ८.३० वाजता मुंबईच्या पश्चिम- नैऋत्य दिशेला ४७० किमी अंतरावर वेरावल तसंच ओमानच्या मसिरा बेटावरील ९६० किमी अंतरावरील पूर्व-आग्नेयेकडे असल्याचं वृत्त आहे. पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी वाढू शकते, असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं नमूद केलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.