www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्याकडे क्रेडीट कार्ड असेल तर ते वापरतांना खालील सूचना विचारात घेणे निश्चितच महत्वाचं आहे, याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला आर्थिक फटकाही बसणार नाही. भारतात 2 कोटी लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे.
आयसीआयसीआय, एचडीएफसी, सिटीबँक, एसबीआय आणि अमेरिकन एक्स्प्रेस, या क्रेडिट कार्ड देणाऱ्या भारतातल्या 5 बड्या बँका आहेत.
क्रेडीट कार्ड वापरतांना खालील चार बाबी नेहमी लक्षात ठेवा
1) क्रेडीट कार्डचं बिल वेळेवर भरा -
तुम्हाला क्रेडीट कार्डचं बिल आलं आणि पैसे भरण्याची तारीख 15 असेल, तर मुदतीच्या आत पैसे भरा.
तुम्हाला 15 तारखेच्या आत पैसे भरता आले नाहीत, तर तुम्हाला फक्त लेट पेमेंट चार्जेस आणि 3 टक्के व्याज द्यावं लागेल, असा
तुमचा समज असेल.
मात्र मासिक व्याज, लेट पेमेंट हे वर्षाच्या व्याज दराच्या हिशेबाने तुम्हाला पडणार आहे. हा दर 35 ते 36 टक्क्यांपर्यंत असू शकतो.
2 ) क्रेडिट लिमिट ओलांडू नका
क्रेडिट कार्डच्या मर्यादेपर्यंत खरेदी करणं ठीक आहे, पण या मर्यादेची खरेदी रेषा ओलांडली, तर बँक तुमच्याकडून 500 रुपये जादा चार्ज वसूल करेल, आणि त्यावर अतिरिक्त खरेदी केलेल्या दरावर सुमारे 2.5 टक्के वेगळं व्याज वसूल करेल.
3) फ्री क्रेडिट कार्ड, जरा सांभाळून
फ्री क्रेडीट कार्डच्या ऑफर समजून घ्या, बँका अनेकवेळा क्रेडिट कार्ड फ्री आहे. त्यावर कोणतेही चार्जेस नाहीत.
मात्र हे कार्ड फक्त पहिल्या वर्षासाठी फ्री असतं. त्यानंतर कार्डचे चार्जेस लागू केले जातात किंवा काही छुपे चार्जेस आकारले जातात. ज्याप्रमाणे 2.5 टक्के फ्युअल चार्ज, ईएमआयसाठी प्रोसेसिंग फी वगैरे.
4) कमी क्रेडिट लिमिटचे जास्त क्रेडिट कार्ड
कमी क्रेडिट लिमिटचे जास्त कार्ड काही लोक घेतात, ही एक चूक असू शकते. त्याऐवजी एकच जास्त लिमिटचे कार्ड घेणं कधीही फायद्याचं.
कारण जास्त कार्ड घेतल्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होऊ शकते. त्यामुळे बँक क्रेडिट लिमिट वाढवत नाही, पण दुसरं कार्ड देण्यासाठी तयार असते. मात्र तुम्हाला या वेगवेगळ्या कार्डवर वेगवेगळं व्याज द्यावं लागतं. सर्व चार्जेस पुन्हा वेगवेगळे आणि वाढता बोझा.
या चार गोष्टी तुम्हाला क्रेडीटवान बनवू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.