राहुल नाही, चिदम्बरम पंतप्रधानपदाचे उमेदवार?

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून राहूल गांधींना नव्हे, तर पी. चिदम्बरम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ‘द इकोनॉमिस्ट’ वृत्तपत्राने ही शक्यता वर्तवली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 2, 2012, 04:20 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून राहूल गांधींना नव्हे, तर पी. चिदम्बरम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ‘द इकोनॉमिस्ट’ वृत्तपत्राने ही शक्यता वर्तवली आहे.
गेल्या काही काळात चिदम्बरम यांनी काँग्रेसचं स्थान देशात मजबूत करण्यासाठी जी कामगिरी केली आहे, ती पाहाता चिदम्बरम यांनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत आहे. चिदम्बरम यांनी दोनवेळा काँग्रेसला अडचणीतून सोडवलं आहे. यामुळे त्यांची पक्षामध्ये प्रतिष्ठा आणि लोकप्रयता वाढली आहे.
‘द इकोनॉमिस्ट’च्या मते प्रणब मुखर्जी राष्ट्रपती बनल्यावर सध्याच्या मंत्रिमंडळात चिदम्बरम हेच सर्वांत ताकदवान मंत्री आहेत. स्वतः राहुल गांधी पक्षामध्ये कुठलीही मोठी जबाबदारी घेण्यास अजून तयार नसल्यामुळे चिदम्बरम हेच काँग्रेसच्या दृष्टीने २०१४ साठी योग्य उमेदवार आहेत.