देशावर वीजेचं संकट, पहिली चर्चा निष्फळ, संपाचा दुसरा दिवस

आपल्या विविध मागण्यांकरता देशातील विविध कोळसा संघटनांचे कामगार काल पासून संपावर गेलेत. आज संपाचा दुसरा दिवस आहे. सरकारी अधिकारी आणि कामगार संघटनांमध्ये काल झालेली चर्चा निष्फळ ठरलीय. या संपामुळे देशावर वीजेचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 7, 2015, 12:16 PM IST
देशावर वीजेचं संकट, पहिली चर्चा निष्फळ, संपाचा दुसरा दिवस title=

नवी दिल्ली: आपल्या विविध मागण्यांकरता देशातील विविध कोळसा संघटनांचे कामगार काल पासून संपावर गेलेत. आज संपाचा दुसरा दिवस आहे. सरकारी अधिकारी आणि कामगार संघटनांमध्ये काल झालेली चर्चा निष्फळ ठरलीय. या संपामुळे देशावर वीजेचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल जे सध्या कोळसा मंत्रालय पण सांभाळतायेत ते आज युनियन नेत्यांची भेट घेणार आहेत. 
दरम्यान, राज्यातील औष्णिक वीज निर्माण केंद्रातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केलंय. 

राज्यातील औष्णिक वीज निर्माण केंद्रात फक्त ५-६ दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. त्यामुळं मोठा वीज तुटवडा निर्माण होण्याची शक्यता उर्जामंत्र्यांनी वर्तवलीय. त्यामुळं लवकरात लवकर हा संप मिटावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये.

(पीटीआय इनपुट्ससह)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.