मेरठ: उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. 'हम दो, हमारे दो' हा नारा बेकार असल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलंय. हिंदूंनी चार अपत्यांना जन्म द्यावा असं साक्षी महाराज यांनी म्हटलंय.
नेत्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये असा इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला असतानाही भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं अद्याप सुरूच आहेत. ' देशातील प्रत्येक हिंदू महिलेने किमान चार मुलांना जन्म दिला पाहिजे' असा सल्ला देत भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
हिंदू धर्माचे रक्षण करायचं असेल तर प्रत्येक हिंदू महिलेनं कमीतकमी चार मुलांना जन्म दिला पाहिजे, असं ते म्हणाले.
याच साक्षी महाराजांनी यापूर्वी नथुराम गोडसे यांना राष्ट्रभक्त म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.
भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांमुळं विरोधकांनी सरकारला धारेवर धरत संसदेचं कामकाजही अनेक ठप्प पाडलं होतं. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना वादग्रस्त वक्तव्यं न करण्याची तसंच आपलं काम चोखपणे करण्याची ताकीद दिली होती. मात्र त्यानंतरही भाजप नेत्यांनी मुक्ताफळं उधळणं सुरूच ठेवलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.