देवभूमीत पुन्हा ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तीस जणांचा मृत्यू झालाय, तर पंचवीस ते तीस लोक बेपत्ता आहेत

Updated: Jul 1, 2016, 05:09 PM IST
देवभूमीत पुन्हा ढगफुटी, 30 जणांचा मृत्यू title=

देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तीस जणांचा मृत्यू झालाय, तर पंचवीस ते तीस लोक बेपत्ता आहेत. उत्तराखंडमधल्या चमोली आणि पिठोरागढमध्ये ही दुर्घटना घडली. 

या दुर्घटनेमुळे चारधाम यात्राही ठप्प झाली आहे. देवप्रयागच्या जवळ जमीन खचलीय, त्यामुळे बद्रीनाथ-हृषिकेष हायवे बंद झाला आहे. ढगफुटीनंतर अलकनंदा, मंदाकिनी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्याही अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.