पंच्च्याहत्तरी ओलांडलेल्या मंत्र्यांना केंद्रात डच्चू?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यामध्ये केंद्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Jul 1, 2016, 04:54 PM IST
पंच्च्याहत्तरी ओलांडलेल्या मंत्र्यांना केंद्रात डच्चू? title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यामध्ये केंद्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीमध्ये पंच्च्याहत्तरी ओलांडलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्र्यांना पक्षाच्या कामासाठी पाठवण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. 

नुकताच मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यामध्येही पंच्च्याहत्तरी पार केलेल्या मंत्र्यांना वगळण्यात आलं, त्यामुळे केंद्रातही हाच फॉर्म्यूला राबवला जाऊ शकतो. 

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतु्ल्ला यांनी नुकतीच वयाची पंच्च्याहत्तरी पूर्ण केली आहे. कलराज मिश्रा हे आजच पंच्च्याहत्तरी ओलांडत आहेत. याआधी वयामुळेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळामध्ये स्थान देण्यात आलं.