धक्कादायक : ऑक्सीजनच्या ऐवजी दिलं नायट्रस ऑक्साइड

महाराजा यशवंतराव रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने ऑपरेशन रुममध्ये ऑक्सीजन ऐवजी गुंगीचा गॅस लावल्याने २ मुलांचा मृत्यू झाला आहे. नायट्रेस ऑक्साइड गॅसमुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.

Updated: May 30, 2016, 06:52 PM IST
धक्कादायक : ऑक्सीजनच्या ऐवजी दिलं नायट्रस ऑक्साइड title=

इंदौर : महाराजा यशवंतराव रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने ऑपरेशन रुममध्ये ऑक्सीजन ऐवजी गुंगीचा गॅस लावल्याने २ मुलांचा मृत्यू झाला आहे. नायट्रेस ऑक्साइड गॅसमुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.

ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या पाईपमधून ऑक्सीजन गॅस दिला जातो त्या ऐवजी नायट्रस ऑक्साइड दिला गेला. या ऑपरेशन थिएटरचं २४ मे रोजी लोकार्पण केलं गेलं होतं.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी ५ सदस्यीय डॉक्टरांची टीम बनवली गेली आहे. प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर रिपोर्ट राज्य सरकारला सोपावण्यात येणार आहे. 

या प्रकरणानंतर या ऑपरेशन थिएटरला सील करण्यात आलं आहे. ज्यांने या पाईपलाईन काम केलं त्या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.