तक्रार करायला गेला, पोलिसांचे बुट पॉलिश करून आला

उत्तर प्रदेश पोलीस काय करायला लावतील याचा काही नेम नाही, तक्रार करायला गेलेल्या लोकांवरच केस ठोकायला ते नेहमी पुढे असतात, चरथावल येथे एक अनोखी घटना समोर आली.

Updated: May 30, 2016, 05:43 PM IST
तक्रार करायला गेला, पोलिसांचे बुट पॉलिश करून आला title=

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश पोलीस काय करायला लावतील याचा काही नेम नाही, तक्रार करायला गेलेल्या लोकांवरच केस ठोकायला ते नेहमी पुढे असतात, चरथावल येथे एक अनोखी घटना समोर आली.

मोबाईल हरवल्याची तक्रार करण्यासाठी एक चप्पल-बुट दुरूस्त, पॉलिश करणारा एक इसम पोलिस स्टेशनमध्ये गेला,

या गरीबाची तक्रार तर त्यांनी लिहून घेतलीच नाही, उलट तू काय करतो, त्याने सांगितल्यानंतर त्याला प्रत्येकाने आपले बूट पॉ़लिश करण्यास सांगितले.

आपला मोबाईल हरवला आहे, त्याची तक्रार घ्यावी अशी त्या गरीबाची मागणी होती, पण अडीच तास बुटांची पॉलिश केल्यानंतरही पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही, शेवटी तो म्हणाला साहेब मी गरीब माणूस आहे.

माझ्या मोबाईलचा गरीबाने गैरवापर केला, तर मला तुम्हीच तुरूंगात टाकाल तेव्हा कृपया तक्रार लिहून घ्या असं सांगितल्यावरही त्याच्याकडे लक्ष दिले गेले नाही.

ही घटना अनेकांना समजल्यावर त्यांनी त्याला वरिष्ठांकडे तक्रार करण्यास सांगितलं, मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही, कारण त्या गरीबाला मोबाईल हरवल्यापेक्षा, पोलीस आपल्यावर सूड बुद्धीने कारवाई करतील अशीच भीती जास्त आहे.