नवी दिल्ली : मोदी सरकार आणि मनमोहन सरकार यांच्या काळातील योजनांवरून आता दोन्ही पक्षांच्या सहकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. मोदी सरकारने मनमोहन सरकारमधील योजनांची फक्त नावं बदलल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
मोदी सरकारच्या कामापेक्षा जाहिरातीच चांगल्या आहेत. यूपीए सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या नावात बदल करून त्याचे श्रेय घेण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज म्हटले आहे.
चिदंबरम म्हणाले, 'मोदी सरकार हे कामापेक्षा जाहिराती करण्याचेच चांगले काम करत आहे. आम्ही अनेक योजना सुरू केल्या असून, त्याचे श्रेय हे सरकार घेत आहे. परंतु, आम्हाला याचा आनंद आहे की, आम्ही सुरू केलेल्या योजना या सरकारने पुढे चालू ठेवल्या आहेत.'
'मी, भारतात जन्म घेतला असून मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. अनेक नागरिकांना भारतात जन्म घेतल्याची लाज वाटते का असे विचारले. परंतु, कोणीही नाही म्हणून सांगितले. पण 26 मे 2014 नंतर भारतात जन्म घेतलेल्या नागरिकाचे उत्तर पुढे समजेल,' असेही चिदंबरम म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.