चिकन खाणाऱ्य़ानो सावधान !

चिकन खाणं आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. अनेक रोगांवर डॉक्टर तू्म्हाला अॅंटिबायोटिक्स देतात पण त्याचा प्रभाव शरीरावर होत नाही आणि यांच कारण चिकन देखील असू शकतं असं एका सर्वेक्षणात आढळलं आहे. सर्वेक्षणानुसार चिकन खाणाऱ्य़ा लोकांनमध्ये रोगांशी लढणाऱ्य़ा प्रतिकारशक्तीमध्ये कमकुवतपणा येत आहे.

Updated: Aug 2, 2014, 05:46 PM IST
चिकन खाणाऱ्य़ानो सावधान ! title=
नवी दिल्ली: चिकन खाणं आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. अनेक रोगांवर डॉक्टर तू्म्हाला अॅंटिबायोटिक्स देतात पण त्याचा प्रभाव शरीरावर होत नाही आणि यांच कारण चिकन देखील असू शकतं असं एका सर्वेक्षणात आढळलं आहे. सर्वेक्षणानुसार चिकन खाणाऱ्य़ा लोकांनमध्ये रोगांशी लढणाऱ्य़ा प्रतिकारशक्तीमध्ये कमकुवतपणा येत आहे.
दिल्ली एनसीआर मध्ये झालेल्या एक सर्वेक्षणानुसार कोंबड्यांना अॅंटिबायोटिक्स खाऊ घातलं जातं कारण त्यांच वजन वाढावं आणि ती त्वरीत मोठी व्हावीत. अशातच चिकन खाणाऱ्य़ावर अॅंटिबायोटिक्सचा परिणाम होणं कमी होऊ शकतं. 40 टक्के अॅंटिबायोटिक्स तर कोंबड्यांच्या शरीरातही अस्तित्वात असतं तरी देखील त्यांना अॅंटिबायोटिक्स द्याव लागतं. अशा स्थितीत चिकन खाणाऱ्य़ावरही औषधांचा परिणाम होणं कमी होतं.  अर्थात रोगप्रतिकार शक्ती कमी होते.
सेंटर फॉर साइंस अॅंड इन्वायरनमेंट (सीएसई) ने या सर्वेक्षणासाठी दिल्ली आणि एनसीआर शहरातून 70 नमुने मागवले. या मधल्या 40 टक्के नमुन्यांमध्ये अॅंटिबायोटिक्स आढळलं तर 17 टक्के नमुन्यांमध्ये एक पेक्षा जास्त अॅंटिबायोटिक्स आढळली. या प्राणघातक समस्या सोडविण्यास सरकारनं त्वरित पावले उचलावी असे सीएसई ने सांगितले.
सीएसईने दिलेल्या अहवालात पोल्ट्री फॉर्ममध्ये डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय सिप्रोफ्लोक्सेक्सिन या अॅंटिबायोटिक्सचा वापर होत आहे. असं चिकन खाऊन आजारापासून सुटका होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्य़ा औषधांचा परिणाम होणार नाही आणि रोग जीवघेणा बनू शकतो.
 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.