मालकानं कर्मचाऱ्यांमध्ये वाटले २०० कोटी!

'हाउसिंग डॉट कॉम' कंपनीचे सीईओ राहुल यादव यांनी कंपनीतील आपले सर्व शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नावे केले आहे. कंपनीत एकून २,२५१ कर्मचारी आहेत, तर राहुल यांच्या शेअर्सची किंमत जवळपास २०० कोटी आहे.

Updated: May 15, 2015, 05:37 PM IST
मालकानं कर्मचाऱ्यांमध्ये वाटले २०० कोटी! title=

नवी दिल्ली : 'हाउसिंग डॉट कॉम' कंपनीचे सीईओ राहुल यादव यांनी कंपनीतील आपले सर्व शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नावे केले आहे. कंपनीत एकून २,२५१ कर्मचारी आहेत, तर राहुल यांच्या शेअर्सची किंमत जवळपास २०० कोटी आहे.

राहुल यांनी २०१२ मध्ये आयआयटी मुंबईमधून शिक्षण पूर्ण केलंय. आपल्या या अनोख्या निर्णयाबाबत २६ वर्षीय राहुल यांनी शुक्रवारी आपल्या निर्णयाबाबत 'हाउसिंग डॉट कॉम'मधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली.

'मी फक्त २६ वर्षांचा आहे. जर मी आत्ताच पैश्यांबाबत सिरिअस झालो तर ही घाई होईल', असं राहुल यादव यांनी म्हटलंय. राहुल यांचा हाउसिंग डॉट कॉमच्या होल्डिंग कंपनी लोकेश सोल्युशनमध्ये ४.५७ टक्के मालकी हक्क आहे.  

गेल्या काही दिवसांत कंपनीच्या डायरेक्टर, चेअरमन आणि सीईओ पदाचा राजीनामा देण्याबाबत ते चर्चेत होते. कंपनीच्या विविध पदांवरून दिलेला राजीनामा निर्णय राहुल यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मागे घेतला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.