नवी दिल्ली: केंद्र सरकारला एक रुपयाची नोट छापण्याचा अधिकार असल्याचा सल्ला देत कायदा मंत्रालयानं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडे २, ५, १०, २०, ५०, १००, ५००, १०००, ५००० आणि १०,००० रुपयाची बँक नोट छापण्याचा अधिकार आहे. तसंच केंद्र सरकार एक रुपयाची नोट छापून बाजारात आणत होते.
भारत सरकारकडे प्रत्येक मूल्याच्या नाण्याची निर्मिती करण्याचा अधिकार आहे. तथापि, रिझर्व्ह बँकेच्या मते, चलन अध्यादेशातील कलम दोन रद्द झाल्यानं भारत सरकारला एक रुपयाची नोट जारी करण्याचा अधिकार नाही. रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा मंत्रालयाचा सल्ला मागविण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.