राजनसाठी सुरक्षा यंत्रणांनी वापरली 'फिल्मी स्टाईल'!

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला अखेर इंडोनेशियावरून दिल्लीत आणण्यात सरकारी यंत्रणांना यश मिळालं आहे. ७० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या राजनपर्यंत प्रसारमाध्यमं पोहचू नये, यासाठी डमी गाडयांचा ताफा वापरण्यात आला. त्यामुळे राजन नेमकं कोणत्या गाडीतून गेला, यासंदर्भात चकवा देण्यात आला. 

Updated: Nov 6, 2015, 11:14 AM IST
राजनसाठी सुरक्षा यंत्रणांनी वापरली 'फिल्मी स्टाईल'! title=

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला अखेर इंडोनेशियावरून दिल्लीत आणण्यात सरकारी यंत्रणांना यश मिळालं आहे. ७० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या राजनपर्यंत प्रसारमाध्यमं पोहचू नये, यासाठी डमी गाडयांचा ताफा वापरण्यात आला. त्यामुळे राजन नेमकं कोणत्या गाडीतून गेला, यासंदर्भात चकवा देण्यात आला. 

अधिक वाचा - छोटा राजनला भारतात आणलं, तपास सीबीआयकडे

राजन याला सध्या सीबीआयच्या मुख्यालयात आणण्यात आले आहे. येथे त्याच्या आरोग्याची तपासणी डाँक्टरांमार्फत केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, २५ नोव्हेंबर रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर अटक केलेल्या छोटा राजन याला १० दिवसांतच दिल्लीत आणण्यात यश आलंय. 

अशी असेल छोटा राजनला सुरक्षा... 

- राजनवर दिल्लीत ७ गुन्हे दाखल आहेत. तर  १९९९ आणि २००१ दरम्यान ६ गुन्हे राजनवर दिल्लीत दाखल झाले. हे सर्व प्रकरण दिल्ली पोलिसांनी सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. 

- राजन याला तीन स्तरावरची सुरक्षा असणार आहे. निमलष्करी दलाचे जवान राजनच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. 

अधिक वाचा - काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा

- राजनच्या सुरक्षेमुळे मॅजिस्ट्रेट यांना सीबीआय मुख्यालयातच बोलवण्यात आलं आहे.

- राजनला पटियाला हाऊस कोर्टात दाखल केले जाईल. 

- सीबीआय तसेच 'रॉ'चे वरिष्ठ अधिकारी राजनची चौकशी करणार आहेत. 

अधिक वाचा - छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ

- 'रॉ'चे जॉईंट डायरेक्टर पंकज सक्सेना आणि डीआयजी राहुल श्रीवास्तव राजनची चौकशी करणार आहेत.

- राजन मोहन कुमार या नावावर राजन प्रवास करत होता. हा पासपोर्ट ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्तांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे बनावट पासपोर्टची चौकशी सध्या सुरू करण्यात आली आहे. 

- दरम्यान, मुंबईतील राजनवरील दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादीच महाराष्ट्र सरकारनं सीबीआयकडे सोपवली आहे.

आणखी वाचा - काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती

- राजनच्या किडण्या खराब झाल्याची माहिती तपास यंत्रणांकडे आहे. त्यामुळे किडण्यांची तपासणी केली जाईल. 

- छोटा राजनचं एम्समध्ये डायलसिस केलं जाईल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.