सोन्याच्या खरेदीचा आणखी एक पर्याय...

यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्या सोने खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत.

Updated: Nov 6, 2015, 10:50 AM IST
सोन्याच्या खरेदीचा आणखी एक पर्याय...  title=

मुंबई : यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्या सोने खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत.

सोन्याच्या कर्जरोख्यांच्या माध्यमातून एक ग्रॅमच्या पटीत सोनं पेपर स्वरुपात सोनं खरेदी करता येणार आहेत. शिवाय सरकारनं प्रथमच अधिकृत सोन्याची नाणी केली आहेत. 

त्याचप्रमाणे तुमच्या कडे असणारं सोनं बँकांमध्ये ठेऊन त्याबदल्यात व्याज देणारी नवी योजनानंही सरकारनं सुरू केलीय. 

या योजनेमुळे देशातल्या वीस हजार टन सोन्यापैकी काही हिस्सा तरी बाजारात परत येईल, असा सरकारला विश्वास आहे. या तीनही योजना सोन्यातल्या गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.