बंगळुरू | २०१० च्या तुलनेत काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा

 दक्षिण भारतात कमल फुललं आहे, आज बंगळुरू महापालिका निवडणुकीचे निकाल आले, यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. 

Updated: Sep 10, 2015, 08:30 AM IST
बंगळुरू | २०१० च्या तुलनेत काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा title=

बंगळुरू :  दक्षिण भारतात कमल फुललं आहे, आज बंगळुरू महापालिका निवडणुकीचे निकाल आले, यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. 

भाजपने १९८ वॉर्डपैकी १०१ जागा भाजपने जिंकल्या आहेत, काँग्रेसलाही ७५ जागा मिळाल्या आहेत, जनता दल सेक्यूलरला १४ तर अपक्षांना आठ जागा मिळाल्या आहेत. 

२०१० च्या तुलनेत काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा
या आधी बंगळुरूमध्ये २०१० मध्ये महापालिका निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा भाजपने १९८ पैकी ११६ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने ६२ आणि जेडीएसने १४ जागा जिंकल्या होत्या, अपक्ष ८ ठिकाणी विजयी झाले होते.

यावरून २०१० च्या मानाने भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत, आणि काँग्रेसच्या वाढल्या आहेत.

हा ऐतिहासिक विजय
हा ऐतिहासिक विजय असल्याचं भाजपचे नेते अनंत कुमार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूच्या कार्यकर्त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.