पणजी : गोव्यात भाजपचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या 13 आमदारांना इतर 9 आमदारांची साथ मिळाली आहे. हे एकूण 22 आमदार राज्यपालांना भेटून भाजप सरकारला समर्थनाचं पत्र देणार आहेत.
संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला हे सगळे आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. या घडामोडींमुळे सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार आहे.
दरम्यान गोव्यातल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीतही केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांना गोव्यात पाठवावं असा ठराव करण्यात आला. गरज पडली तर आम्ही भाजप अध्यक्ष अमित शाह यांनाही भेटू अशी भूमिका या आमदारांनी घेतलीय.