नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून तुम्हाला बँकेतून हवी तितकी रक्कम काढता येणार आहे. नोटाबंदीनंतर विविध खात्यांतून पैसे काढण्याबाबत मर्यादा ठरवण्यात आली होती.
रिझर्व्ह बँकेने गेल्या ८ फेब्रुवारीला बँकेतून पैसे काढण्याबाबतची घोषणा केली होती. त्यावेळी बचत खात्यातून ग्राहकांना आठवड्याला २४ हजार काढण्याची मुदत देण्यात आली होती.
त्यानंतर २० फेब्रुवारीला ही रक्कम वाढवून ५० हजार काढण्यात आली. आता ही मर्यादा संपणार आहे. येत्या सोमवारपासून तुम्ही तुमच्या खात्यातून हवी तितकी रक्कम काढू शकणार आहात.
नोटाबंदीनंतर नोटांचा तुटवडा वाढल्याने एटीएम तसेच बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र हळूहळू नोटांचा तुटवडा कमी झाल्याने ही मर्यादाही शिथिल करण्यात आली.